Khed : सोळू स्फोटात आणखी दोन मृत्यू; बड्या राजकीय नेत्याचा मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज : आळंदी जवळील सोळू (ता. खेड, जि.पुणे) येथील (Khed) बंद असलेल्या स्पेसिपिक आलोय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. आणखी दोघांचा मृत्यू झाला असून आता या घटनेतील मृतांचा आकडा सात एवढा झाला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पोलिस कोठडी व एका आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

या भीषण स्फोटात सात जणांचा बळी गेला आहे, तर पंधरा जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खेड तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेतील गुंता आणखीच वाढ आहे.

Maval : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घर ते परीक्षा केंद्र मोफत वाहतूक सेवा

या कंपनीचे मालक असलेले आरोपी नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे) आणि फनिंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) या दोघा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता आधी पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीचा आदेश मिळाला. सध्या दोघेही आरोपी येरवडा कारागृहात आहेत.

तर या स्फोटासाठी कारणीभूत ठरलेले आरोपी शुभम रामदास ठाकूर (वय. 26) व आकाश बाबूराव गावडे (वय 21) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम ठाकूर याला या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याने या दुर्घटनेत नेमका कुणाचा आणि कसा सहभाग आहे , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी सभापती रामदास ठाकूर यांचा मुलगा शुभम ठाकूर आणि आकाश बाबूराव गावडे (वय 21, रा. धानोरे, ता. खेड) यांना पोलिसांनी तपासात निष्पन्न करून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी सभापती रामदास ठाकूर यांचे (Khed) चिरंजीव शुभम ठाकूर यांनी स्फोट झालेल्या कंपनीची जागा नुकतीच बॅंकमार्फत झालेल्या लिलावात खरेदी केली होती.

मात्र प्रत्यक्षात ताबा आपल्याकडे नसल्याचे ठाकूर कुटुंबीयांनी सुरुवातीला सांगितले होते. नंतर त्यांना पोलिसांनी तपास करून अटक केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना, तसेच जखमी झालेल्यांना अद्याप कंपनी अथवा शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत मिळालेली नाही. या दुर्घटनेत सुरुवातीपासून स्फोट नेमका कशाचा झाला ? स्फोट झाला त्यावेळी कंपनीत काही प्रक्रिया केली जात होती का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.