Kiwale News : खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – किवळे-विकासनगर येथे (Kiwale News) शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून दोन कोटी रुपयांची सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. या कामाचा खासदार बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र बाळासाहेब तरस यांनी पाठपुरावा केला होता.

विकासनगर येथील समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, पेंडसे कॉलनी आणि वाळुंज चाळ या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राजेंद्र तरस, निलेश तरस, रोहित माळी, रामचंद्र तरस, सुधाकर माळी, सुधीर तरस, विपुल डोके यांच्यासह नागरीक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

विकासनगर येथे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून काही रस्त्यांची कामे प्रलंबित होती. याबाबत खासदार बारणे यांच्याकडे पाठपुरावा केला. या जनहिताच्या मागण्यांना खासदार बारणे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात टेल्को बिल्डिंग ते मराठी शाळा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. या कामासाठी दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

Pimpri News : स्वच्छता सर्वेक्षणाची रिक्षाद्वारे जनजागृती

आता दुसऱ्या टप्प्यात समर्थ कॉलनी, मोरया कॉलनी, पेंडसे कॉलनी आणि वाळुंज चाळ या (Kiwale News) ठिकाणी होणाऱ्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.