Pimpri News : स्वच्छता सर्वेक्षणाची रिक्षाद्वारे जनजागृती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर हे राहण्यायोग्य उत्तम शहर असून या शहरात दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. (Pimpri News) त्या अनुषंगाने शहरामध्ये होणा-या सर्वेक्षण मोहीमेत नागरिकांचा मोठ्या संख्येने  सहभाग वाढावा, यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून त्यादृष्टीने या मोहिमेची विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत असून या उपक्रमाला अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी तसेच रिक्षाचालक उपस्थित होते.  केंद्र शासनाच्या अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022 या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे देशातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.

PMPML new route : कोथरूड डेपो ते चतुश्रुंगी या मार्गावर 24 नोव्हेंबर पासून पीएमपीएमएलची बस सेवा होणार सुरू

23 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरीकांचा सहभाग वाढविण्यासाठी अॅटोरिक्षांवर पोस्टर्स लावून याबाबत जनजागृती करण्याबाबतची  मोहिम आजपासून सुरु करण्यात आली आहे.(Pimpri News) तसेच नागरिकांना याबाबत माहिती व्हावी, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022” उपक्रमाचे स्टँडी उभारण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने “अर्बन आऊटकम्स फ्रेमवर्क 2022” च्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी https://bit.ly/EOL2022 या लिंकवर क्लिक करून युएलबी कोड 802811 द्वारे सर्वेक्षण फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. तसेच, प्रतिक्रिया नोंदवून पिंपरी-चिंचवड शहराला स्पर्धेमध्ये विजयी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.