PMPML new route : कोथरूड डेपो ते चतुश्रुंगी या मार्गावर 24 नोव्हेंबर पासून पीएमपीएमएलची बस सेवा होणार सुरू

एमपीसी न्यूज : कोथरूड डेपो ते चतुश्रुंगी या मार्गावर दि. 24 नोव्हेंबर पासून पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ची बस सेवा सुरु होणार आहे. (PMPML new route) प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता ही नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

गुरुवार  24 नोव्हेंबर 2022 पासून कोथरूड डेपो ते चतुश्रुंगी या मार्गावर बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणी नुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रायोगिक तत्वावर हा बस मार्ग सुरु करण्यात येणार आहे.

 

 

*कोथरूड डेपो वरून बस सुटण्याची वेळ*

सकाळी 8.00, 8.40, 9.20, 10.00, 10.40, 11.20,

दुपारी 4.00, 4.40, 5.20,

रात्री 6.00, 6.40, 7.20,

 

*चतुश्रुंगी वरून बस सुटण्याची वेळ*

सकाळी 8.40, 9.20, 10.00, 10.40, 11.20,

दुपारी 12.00, 4.40, 5.20,

रात्री 6.00, 6.40,7.20, 8.00

Pune : पुणे गारठले, पारा 8.8 अंशावर

सदर बस मार्ग सुरु होत असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे, (PMPML new route) तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर आणखी बसेस वाढविण्यात येतील.

 

*मार्ग क्र. एन – ४ डेक्कन जिमखाना ते गोखलेनगर या बस मार्गात बदल*

दि. 24 नोव्हेंबर 2022 पासून मार्ग क्र. एन – 4 डेक्कन जिमखाना ते गोखलेनगर या बस मार्गामध्ये बदल करून डेक्कन, भांडारकर रोड, सिंबायोसिस कॉलेज, शेती महामंडळ, कुसाळकर पुतळा, सेनापती बापट रोड यामार्गे संचलनात राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.