Pune : पुणे गारठले, पारा 8.8 अंशावर

एमपीसी न्यूज – थंडीचा कडाका (Pune) वाढला असून पुण्याचे आजचे तापमान हे 8.8 अंशावर गेले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे पुण्यातील थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे व जळगाव येथे आजचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले असून दोन्ही जिल्ह्यात पारा हा 8 अंशावर पोहचला आहे. थंडीची लाट दोन दिवस कायम राहणार असून नागरिकांनी याबाबत योगय ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 23 नोव्हेंबर पासून थंडीची तिव्रता कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Pune News : पुणे शहरातील ‘या’ भागांत गुरुवारी पाणी बंद, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

दुपारी देखील थंडीची तिव्रता जाणवत असल्याने नागरिकांनी (Pune) शेकोटी व गरम कपड्यांचा आधार घेतला आहे. प्रचंड पावसानंतर पुणेकरांना कडाकीच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी सकाळी धुक्याची झालर व गुलांबी थंडी यामुळे पुणेकरांना महाबळेश्वरचा अनुभव हा पुण्यातच अनुभवायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.