Kondhwa : पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून भर रस्त्यात दांपत्याचे अमेरिकन डॉलर लुबाडले

एमपीसी न्यूज : पायी निघालेल्या दांपत्याला भर रस्त्यात (Kondhwa) अडवून पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले. तुमच्याजवळ गांजा असल्याचे सांगून बॅग तपासण्याच्या बहाण्याने जवळपास तीन लाख रुपये चोरून नेले. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेलकम हॉल चौकात 9 एप्रिलच्या रात्री हा प्रकार घडला.

कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलखदर अब्दुल ओमर अलहखैरी (वय 58) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Mahavitaran : महावितरणमधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी लेबर ऑफिस पुणे येथे लाक्षणिक उपोषण

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी कोंढवा परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये रात्रीची जेवण करून घरी परत जात होते. वेलकम हॉल चौक येथून पायी जात असताना कारमधून (Kondhwa) तीन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले.

त्यांच्यातील एकाने पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून फिर्यादीजवळ असलेल्या हँडबॅगेत गांजा असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीची हँडबॅग तपासण्यासाठी घेतली आणि हातचलाखीने त्यातील 4000 अमेरिकन डॉलर काढून घेतले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.