Shirur : पती-पत्नी शेतात राबताना गुड न्यूज; एकाच वेळी दोघेही पोलीस भरतीत पात्र

एमपीसी न्यूज : पती-पत्नी दोघेही शेतात एकत्र राबवत असतानाच एक अशी काही वार्ता (Shirur) त्यांच्या पर्यंत आली, की दोघेही आनंदून गेले. दोघेही एकाच वेळी पोलीस भरतीत पात्र ठरले. या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेत आनंद साजरा केला. यावेळी पतीचे आई-वडीलही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या दोघांच्याही डोळ्यात यावेळी आनंद अश्रू पाहायला मिळाले.

शिरूर तालुक्यातील चांडोह येथे राहणारे तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार हे दोघेही एकाच वेळी पोलीस भरतीत पात्र ठरले. शेतकरी कुटुंबातील हे दोघेही असल्याने संपूर्ण गाव या दोघांच्या निवडून येण्याने आनंदून गेला. तुषार यांची आई कुसुम शेलार यांनी पाच वर्ष सरपंच म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी विविध विकास कामे करत गावात लौकिक मिळवला आहे.

दरम्यान, तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह 2020 मध्ये झाला आहे. लग्नानंतर दोघांनीही पोलीस व्हायचेच असा निश्चय केला होता. आणि त्या दृष्टीने दोघेही तयारी करत होते. मागील चार वर्षापासून ते यासाठी कष्ट घेत होते. व्यायाम करणे अभ्यास करणे आणि शेतातली कामे करणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.

Kondhwa : पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून भर रस्त्यात दांपत्याचे अमेरिकन डॉलर लुबाडले

मात्र, आज पोलीस भरतीसाठी आपण पात्र ठरल्याचे समजल्यानंतर दोघांनीही इतक्या दिवसापासून करत (Shirur) असलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत असल्याची भावना बोलून दाखवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.