Kondhwa : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर छापा ; 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज-कोंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर गुन्हे (Kondhwa) शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.10) करण्यात आली.

PCMC : मुळा नदी सुधार प्रकल्पात 310 झाडे होणार बाधित

एन.आय.बी.एम. कोंढवा परिसरात एका हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी काहीजण हुक्का पार्लरमध्ये धूम्रपान करताना दिसून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि हुक्का बनवणारे वेटर अशा एकूण चार जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात  (Kondhwa) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.