Kothrud : आषाढी निमित्त 27 जूनला रंगणार ‘नामाचा गजर’

एमपीसी न्यूज – कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित (Kothrud) नामाचा गजर हा अभंग व संत रचना यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम येत्या मंगळवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मयूर कॉलनी कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. 

सदर कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष असून यावर्षी इंडियन आयडॉल स्पर्धेतील प्रसिद्ध स्पर्धक जगदीश चव्हाण, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री, पार्श्वगायिका व संगीतकार केतकी माटेगावकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू आणि सुपुत्र विराज व श्रीनिवास जोशी हे संत रचना, अभंग सादर करतील.

Yog Day 2023 : भारताने साजरा केला ‘योग’ दिवस; राजकारणी, कलाकार मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग

अविनाश दिघे व उदय कुलकर्णी (हार्मोनियम), पांडुरंग पवार व प्रशांत पांडव (तबला), गंभीर महाराज (पखवाज) आदी सह कलाकार प्रमुख कलाकारांना साथ देतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश थिटे करतील.

नामाचा गजर कार्यक्रमादरम्यान देण्यात येणारा वैष्णव पुरस्कार यावर्षी (Kothrud) संगीत नाटक अकादमीचा ’फेलो सन्मान’ प्राप्त प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ. नंदकिशोर कपोते यांना प्रदान करण्यात येणार आहे. रुपये 11 हजार रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या आधी पंडित शौनक अभिषेकी, पंडित आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, पंडीत श्रीनिवास जोशी व पंडीत हेमंत पेंडसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.