Yog Day 2023 : भारताने साजरा केला ‘योग’ दिवस; राजकारणी, कलाकार मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज – मानवाला शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्त करण्याचा (Yog Day 2023) शाश्वत मार्ग म्हणजे योग होय. या अशा विविध व्याधीतून मुक्त होण्यासाठी आणि शरीर सदृढ करण्यासाठी विश्वाने योगाचा मार्ग स्वीकारला आहे. 21 जून हा जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. प्राचीन भारताने संपूर्ण जगाला दिलेली ही देणगी आहे. आज भारताने दिलेल्या या देणगीचा संपूर्ण जगाला लाभ होत आहे. या निमित्ताने बऱ्याच राजकरणी आणि कलाकारांनी आजच्या दिवसांच्या दिलेल्या शुभेच्छा आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ – 

 

आजच्या दिवसाची स्थापना – 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 69 व्या सत्राला संबोधित करताना योग दिनाची संकल्पना मांडली. त्यानंतर, 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 193 सदस्य राष्ट्रांनी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यास एकमताने सहमती दर्शविली. त्यानंतर येणाऱ्या 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

पंतप्रधान मोदी करणार नेतृत्व –

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मुख्यालयात होणाऱ्या योग दिनाच्या सोहळ्याचे (Yog Day 2023) नेतृत्व करत आहेत. ज्यामध्ये 180 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शिवाय, ‘वसुधैव कुटुंबकम’ या संदेशासह अडीच कोटी लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्हिडीओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, भारताने नेहमीच एकत्र येणा-या, अंगीकारणार्‍या आणि स्वीकारणार्‍या परंपरांचे पालनपोषण केले आहे आणि योगाद्वारे विरोधाभास, अडथळे आणि प्रतिकार दूर करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रपतींपासून मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा –

तर, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वानी सोशल मीडियावर स्वतः योगासन करत फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय योगगुरू बाबा रामदेव यांनी सुद्धा आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याबरोबर सकाळी  सलग २ तास योगसने केली. गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री शरद पवार या सर्वानी सोशल मीडियाद्वारे लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कलाकारही योग दिनात सहभागी –

बॉलिवूड कलाकारांमध्ये योगप्रेमी मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, करीना कपूर खान, आलिया भट्ट, सुश्मिता सेन, राकुल प्रीत सिंह, मिलिंद सोमण, अनुपम खेर, आदी कलाकारांनी स्वतःचे योगासने करतानाचे फोटो व व्हिडिओ शेअर केले असून सध्या ते इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

शिल्पा शेट्टीने सादर केले सर्वात कठीण योगासन –

शिल्पा शेट्टीने तर वृक्षासन व नटराजासन असे अवघड योगासने करतानाची चित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत, तर मलायकाने योगा व्यक्तीसाठी कसे उपयोगी आहेत? ही माहिती सुद्धा शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

‘या’ वयातही अनुपम खेर ‘फिट’ –

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा योगासने करत, “एज डज नॉट मॅटर’ असा संदेश सर्व लोकांना इंस्टाग्रामद्वारे दिला आहे. निवृत्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने ही मॅटवर योगासने करत योग दिन साजरा करून सर्वाना इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.