Nigdi :   जागतिक योग दिन उत्साहात साजरा, 200 जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज – निगडी,  प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये 200  जणांनी सहभाग घेत योगाचे धडे घेतले.

Yog Day 2023 : भारताने साजरा केला ‘योग’ दिवस; राजकारणी, कलाकार मंडळींचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आज संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. निगडीतील रमादेवी सदाशिव वर्टी सभागृहात पतंजली योगपीठाच्या योगशिक्षिका शारदा रिकामे यांनी योगाचे धडे दिले. आयोजक अमित राजेंद्र गावडे, आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर यावेळी उपस्थित होते.

योगपीठाच्या शिक्षिका शारदा रिकामे,  सहाय्यक योग  शिक्षक योगेश निसळ, संदीपा मोरे यांनी योगाचे धडे दिले. योगसाधना, प्राणायामाचे सादरीकरणाशिवाय  राजयोग, हठयोग, लययोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग असे सर्व योगाचे प्रकार सांगितले. ओंकार, प्राणायम, पाठीवर, पोटावर झोपून योगासनांची प्रात्यक्षिके झाले. सव्वा तास योग प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम झाला. सुमारे 200 लोकांनी योगाचे धडे घेतले.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव वाढला आहे. तणावातून मुक्ती मिळण्यासासाठी, निरोगी राहण्याकरिता योगा करणे आवश्यक आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. नियमित योग केल्याने निरोगी राहाता येते. त्यासाठीचा आवश्यक व्यायाम योगातून मिळतो, असे अमित गावडे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना वर्टीकर यांनी केले. तर, डॉ. शुभांगी म्हेत्रे यांनी आभार मानले.  भगवान महाजन यांनी सूत्र संचालन केले. चंद्रशेखर जोशी यांचे विशेष सहाय्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , निलेश जांभळे, संदीप शेळके, अक्षय भोसले यांनी संयोजनात सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.