Baner : जास्त व्याज देण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जास्त व्याज देण्याच्या बहाण्याने (Baner) गुंतवणूकदारांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 5 जून ते 20 जून या कालावधीत बाणेर येथे घडली.

राजेंद्र केशव आळेकर (वय 61, रा. आनंदनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेहान एंटरप्रायजेसचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi :   जागतिक योग दिन उत्साहात साजरा, 200 जणांचा सहभाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर नागरिकांना जास्त व्याज देण्याचे (Baner) आमिष दाखवले. त्यातून गुंतवणूकदारांकडून आरोपींनी सात लाख 56 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. आरोपींनी अशा प्रकारे अन्य गुंतवणूकदारांची देखील फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.