Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

एमपीसी न्यूज –  इंद्रायणी महाविद्यालय, इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ बी फार्मसी, (Talegaon Dabhade) इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी व इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिमखाना विभागामार्फत 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

Baner : जास्त व्याज देण्याच्या बहाण्याने साडेसात लाखांची फसवणूक

याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी फार्मसीचे प्राचार्य डॉ जी एस शिंदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन सहकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस के मलघे होते. योगासन ही फक्त कसरत नसून शरीर मन आणि आत्मा यांना जोडणारा दुवा आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीचा दाखला देत विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शारीरिक संतुलना बरोबरच मानसिक संतुलन, आरोग्य राखणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ.मलघे म्हणाले.

 

‘वसुधैव कुटुम्बकम’ ही ९ व्या जागतिक योग दिनाची थीम आहे. म्हणजेच विश्व एक कुटुंब या स्वरूपात सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे. जो सर्वांना एकत्र करतो आणि सोबत घेऊन जातो असे सांगत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व प्राचार्य डॉ एस के मलघे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन इंद्रायणी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुरेश थरकुडे यांनी केले.  याप्रसंगी प्राध्यापक जगताप शिवाजी यांनी उभी राहून करावयाची आसने, बसून करावयाची आसने, पोटावर व पाठीवर झोपून करावयाची आसने,  प्राणायाम यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.