Pimpri : उद्योगनगरीत योगदिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत जागतिक योग दिन विविध प्रात्यक्षिकांद्वारे साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश आयोजित पतंजली योगपीठ, हरिद्वार आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रेरणेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विश्वात योग चा प्रसार करत राजेश अण्णा पिल्ले यांच्या संयोजनातून ‘पंचम जागतिक योग दिन’ निमित्त योग साधना, योगाभ्यास, प्रणायाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एस. एस. अजमेरा शाळा अजमेरा कॉलोनी पिंपरी येथे  शाळेमधील 200 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन संपूर्ण जगाला स्वस्थ आणि आरोग्यमय जीवनाचा मार्ग दाखवणारा योग हा भारताच्या प्राचीनता आणि विविधतेचे प्रतीक आहे. शारीरिक क्षमता,बौद्धिक पातळी वाढवण्यासह आत्मिक समाधान देणारी अमूल्य नैसर्गिक भेट भारताने जगाला दिली आहे.

जागतिक योग दिनानिमित्त  ‘निरोगी व सुखी जिवनासाठी योगा केला,तसेच आपले आरोग्य कसे निरोगी राहील याचे मार्गदर्शन योगगुरू सौ.चंद्रकला काळे यांनी विद्यार्थ्यांना योगांचे प्रकार शिकवत केले, राजेश पिल्ले, स्वीकृत सदस्या वैशाली खाडये, आणि युवा मोर्चा चिटणीस अमोल दामले यांनी विद्यार्थांनबरोबर योग करून जागतिक योग दिनात योगा करून सहभाग घेतला.

जागतिक योगदिनानिमित्ताने पिंपळे सौदागर येथे  चॅलेंजर पब्लिक स्कूल मध्ये ओंकार , सूर्यनमस्कार व इतर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली . यावेळी  शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप विठ्ठल काटे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या .आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पालक वर्गासाठी तीन दिवसाच्या विशेष योगसत्राचे आयोजन  शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप विठ्ठल काटे यांच्या प्रेरणेतून केले गेले. शाळेच्या शिक्षिका  सुलक्षणा फुलारी, अपर्णा सरवटे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व विशद केले.हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमासाठी  शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.