Chikhali : कृष्णानगरमध्ये चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना कृष्णानगर येथील ब्ल्यू बेल सोसायटीत शुक्रवारी (दि. 21) घडली.

इम्तीयाज बहाउद्दीन शेख (वय-48, रा. ब्ल्यु बेल सोसायटी, कृष्णानगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेख यांचे घर शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. एका तासातच चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 95 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 लाखांची रोकड असा 3 लाख 85 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. चिखली ठाण्याचे फौजदार बागुल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.