Dehugaon: फेसबूक दिंडीचा ‘देह पंढरी’ उपक्रम; अवयवदानाविषयी जनजागृती

एमपीसी न्यूज – यंदा जगद्‌गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 334 वे वर्ष असून फेसबूक दिंडी उपक्रमाचे नववे वर्ष आहे. यावेळी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून फेसबूक दिंडीने देह पंढरी हा उपक्रम हाती घेतला आहे.

फेसबूक दिंडीच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पालखीचे अपडेटस्‌ फोटो आणि व्हिडीओ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. टीम फेसबूक दिंडीबरोबर धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशिओ, हेल्थ ट्रान्स्फॉर्मेशन (दोस्त) यांच्या सहकार्याने देह पंढरी – मरावे परी देह रूपी उरावे हा उपक्रम घेण्यात येत आहे.

  • फेसबूक दिंडीच्या लिंकवरुन अवयवदानाचा ऑनलाईन फॉर्म भरून अवयवदाता बनणे शक्‍य होणार आहे. यासाठी फेसबूक दिंडी टीमचे सदस्य मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमीत चव्हाण, ओंकार महामुनी, अमोल गावडे कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.