Lawrence Bishnoi धक्कादायक; ग्रामीण भागातील ११ जण बिश्र्नोई गॅंगच्या संपर्कात

एमपीसी न्यूज – पुणे शहरासह ग्रामीण भागात काही भागांत गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राण्या अण्णासाहेब बाणखेले यांची हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात पोलीसांनी महाकाळ याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ग्रामीण भागातील ११ तरुण गॅंगस्टर लॅरेन बिश्र्नोई (Lawrence Bishnoi)  याच्या गॅंगच्या संपर्कात असल्याची प्राथमिक माहीती पोलीसांना मिळाली आहे.

 

Shaktiman Ghosh : विकास आराखड्यात अडीच टक्के जागा फेरीवाल्यांना द्या

 

 

पोलीसांना मिळालेल्या या माहीतीमुळे ग्रामीण भागात घबराहटीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर पोलीसांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. यामुळे ग्रामीण पोलीसांसमोर आता मोठे आव्हान तयार झाले आहे.

 

 

 

पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात बिश्र्नोईचा (Lawrence Bishnoi) हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणात पोलीसांनी त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे.या प्रकरणा कांबळेसह कुख्यात गुंड संतोष जाधव यालाही अटक केली आहे. पोलीसांनी कांबळे याच्याकडे केलेल्या चौकशीत अकरा तरुणांबाबत माहिती मिळाली होती. त्याशिवाय अभिनेता सलमान खान व त्याच्या वडिलांनाही बिश्र्नोई गॅंगने धमकी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.