Terrorist in Pune : दापोडीतून अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचा आणखी एक साथीदार गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील दापोडी परिसरातून दहशतवाद (Terrorist in Pune) विरोधी पथकाने लष्कर-ए-तोएबाशी संबंधित असलेल्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. त्यानंतर आता याच अतिरेक्याच्या संपर्कात असणाऱ्या उत्तर प्रदेशातील आणखी एका संशयित अतिरेक्याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या दापोडी परिसरातून लष्कर-ए-तोएबाशी संबंध असल्याच्या संशयावरून जुनैद महंमद (वय 28, सध्या रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि साथीदार आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

जुनैद, आफताब यांची चौकशी (Terrorist in Pune) करण्यात आली. चौकशीत इनामूल हक लष्कर-ए-तोएबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. त्यानंतर हक याला अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.