Level Crossing Awareness : आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिनानिमित्त लेवल क्रॉसिंग जागरूकता सप्ताह

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिनानिमित्त (Level Crossing Awareness) पुणे रेल्वे विभागात 2 ते 9 जून या कालावधीत लेवल क्रॉसिंग जागरूकता सप्ताह घेण्यात आला. यामध्ये पुणे – दौंड – बारामती,  पुणे – मिरज – कोल्हापुर, पुणे – लोणावळा सेक्शनमध्ये रेल्वे फाटक, रेल्वे लाईनच्या शेजारी असलेली गावे, वस्त्यांवर रेल्वेच्या अधिकारी, कर्मचा-यांनी लेवल क्रॉसिंगबाबत माहिती देण्यात आली.

Maharashtra Monsoon : राज्यात दोन दिवसांत मान्सून धडकणार

 

सप्ताहात (Level Crossing Awareness) अपर विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि अधिका-यांनी घोरपडी येथील रेल्वे फाटकावर नागरिकांशी संवाद साधला. रेल्वे फाटक बंद असताना काय काळजी घ्यावी याबाबत पाम्पलेटद्वारे संदेश देण्यात आला. व्हाट्सअप या सोशल मीडियाद्वारे देखील नागरिकांना याबाबत संदेश पाठवण्यात आले. रेल्वे स्थानकावर उद्घोषणा करून याबाबत जागरूकता वाढविण्यात आली.

 

या सप्ताहाचे आयोजन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा,  अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह,  प्रकाश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता (उत्तर) मनीष कुमार सिंह, सहाय्यक विभागीय सुरक्षा अधिकारी आर. के. लादे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा सल्लागार रवि कुमार, एस. डी. गोसावी, विनय कुमार, के. जी. खरात, धनंजय चंद्रात्रे, प्रल्हाद फंड, सीनियर सेक्शन इंजीनियर- पुणे यार्ड रमेश कुमार,  सीवायएम जीआईटी आर.पी. सांगळे,  टी. एन. आई डीटीसी बी. के. शुक्ल,  संरक्षा कार्यालय अधीक्षक प्रवीण दरगुडे, मोहन शिंदे, रोहित यांच्या पथकाने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.