Two Teenagers Attack :‘इन्स्टाग्रामवर’ व्हीडीओ अपलोड केल्याच्या रागातून दोन अल्पवयीन तरुणांचा एका अल्पवयीन तरुणावर हल्ला

एमपीसी न्यूज –  एक वर्षापूर्वी काढलेला व्हीडीओ इंन्स्टाग्रामवर अपलोड केल्याच्या रागातून  एका अल्पवयीन तरुणावर दोन (Two Teenagers Attack) अल्पवयीन तरुणांनी हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील केळगाव इंद्रायणीनगर हॉस्पीटल परिसरात घडली आहे.‍  फिर्यादी 8 जून रोजी रात्री आईला सोडण्यासाठी संतोषी माता मंदीर परीसरात आला होता. आईला सोडून घरी परतत असतांना दोन अल्ववयीन तरुणांनी हल्ला केला. लोखंडी पटटीने डोक्यात तसेच पाठीवर वार केल्याने तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे.‍ ही घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. त्यावेळी परिसरात लोकांची वर्दळ कमी होती.

 

Selling Parrots : पोपटांची विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज : रामभाऊ जाधव

 

एक वर्षापूर्वी एका लग्न समारंभात काढलेला ‍ व्हीडीओ फिर्यादीने  इंन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्याने व्हीडीओ अपलोड केल्याचा राग दोन (Two Teenagers Attack) तरुणांच्या मनात होता. ‘तु व्हीडीओ अपलोड का केलास’ अशी विचारणा करत दोन तरुणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. लाथाबुक्काने मारहाण करून त्याच्या डोक्यावर तसेच पाठीवर लोखंडी पटटीने जबर मारहाण केली. त्यापैकी दुस-या आरोपीच्या हातात लोखंडी काणस होती. काणसीने मारहाण केल्यामुळे सदर तरुणाच्या मनगटाला तसेच दंडाला जबर जखम झाली आहे.

 

तसेच  तु जर पोलीसांत तक्रार दाखल केलीस तर तुला घरात घुसून मारू अशी धमकी देत वाईट प्रकारे शिवीगाळ करत दोघांनी (Two Teenagers Attack) तेथून पळ काढला. या प्रकरणी  आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.