Pimpri : महापालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरिता परवाना बंधनकारक

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना गुरे पाळणे, त्याची ने-आण करण्याकरिता परवानी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरवर्षी त्याचे नुतनीकरण करणे आवश्यक असून विना परवाना गुरे पाळणे, त्याचे ने-आण केल्यास कारवाई केली जाणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रवीण परब यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा पुणे व पिंपरी-चिचवड महापालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांसाठी सन 2004 पासून लागू करण्यात आलेला आहे. याबाबत वारंवार नोटीसा तसेच वृत्तपत्रातून निवेदन देऊन त्याचप्रमाणे आकाशवाणीमार्फत आवाहन करून परवाना घेण्याकरिता कळविण्यात आले आहे. जे गोठेधारक परवाना घेणार नाहीत. तसेच घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत. अशा गोठेधारकांवर महाराष्ट्र गुरे नियंत्रण कायदा-1976 मधील कलम क्र. (3) व (7) नुसार पोलीस कारवाई केली जात आहे.

ज्या गोठेधारकांनी अद्याप परवाना घेतलेला नाही. त्यांनी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पुणे यांच्या कार्यालयाशी 020-25812890 या क्रमाकांवर संपर्क साधावा. गोठेधारकांचे छायाचित्र, रेशनकार्डाची झेरॉक्स प्रत, कोर्ट फी स्टॅप पाच रुपये, तसेच ज्यांनी यापूर्वी अनुज्ञाप्ती घेतलेली आहे. त्यांनी सन 2019-20 पर्यंत अनुज्ञाप्ती नुतनीकरणाकरिता संपर्क साधावा. अन्यथा कारवाई केली जाईल. या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत. अशा गोठेधारकांवर शासनाची थकबाकी म्हणून घोषित करण्यात येणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.