Loksabha Election 2024 :व्हीव्हीपॅटमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या संदेशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदानानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसणाऱ्या चिठ्ठीबाबत व्हॉट्सॲप वरुन एक चित्रफीत व त्यासोबत संदेश प्रसारीत होत असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चाचणी मतदानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

प्रसारीत होत असलेला संदेश हा मतदानाच्या दिवशी, मतदान करताना मतदाराने (Loksabha Election 2024) ज्या पक्षाला मतदान केले आहे त्या पक्षाची चिठ्ठी व्हीव्हीपॅटमध्ये खाली पडताना न दिसल्यास हरकत घेण्याबाबतच्या आशयाचा आहे.

Pune : मतदार जागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात भित्तीपत्रक प्रदर्शन

त्या अनुषंगाने एखाद्या मतदाराने त्याने केलेले मतदान हे इतर उमेदवारास (Loksabha Election 2024) दर्शवित असल्याबाबत अभिकथन केले असल्यास सदर मतदारास निवडणूक संचालन नियम 1961 च्या नियम 49 एमए अन्वये चाचणी मतदान करणेसाठी प्रतिज्ञापत्र सादर करावयाची तरतुद आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्रकात मतदाराने केलेले अभिकथन चुकीचे आढळल्यास भारतीय दंड सहिता कलम 177 अन्वये दंडात्मक तरतूद असल्याबाबतचे देखील नमूद आहे, असेही जिल्हा निवडणूक  प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.