Loksabha Election 2024 : राज्यातील पहिली कारवाई; व्हाट्सअप वरून प्रचार केल्या प्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेचा कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप’, ग्रुप वरून प्रचार ( Loksabha Election 2024 ) करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला गुरुवारी (दि. 28) निलंबित करण्यात आले आहे.

पंचायत समिती नायगाव येथे वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले यु. एस. धोटे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जारी केले आहे.

Loksabha Election 2024 : निवडणूक प्रक्रियेसाठी सविस्तर दळणवळण आराखडा तयार करा – डॉ. सुहास दिवसे

‘व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तवणूक ) नियम 1967 मधील कलम 3 व 4 कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली असून आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले ( Loksabha Election 2024 ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.