PCMC : महापालिकेतील पाच सहाय्यक आयुक्त ‘गॅस’वर!

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाळ ( PCMC) पूर्ण झालेल्या आणि गृह जिल्हा असलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या केल्यानंतर आता राज्याच्या नगर विकास विभागाने सहायक आयुक्तांची माहिती मागविली आहे. त्यामुळे  5 सहायक आयुक्त गॅसवर आहेत.

Loksabha Election 2024 : निवडणूक प्रक्रियेसाठी सविस्तर दळणवळण आराखडा तयार करा – डॉ. सुहास दिवसे

निवडणूक आयोगाने राज्यातील विविध शासकीय अधिका-यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व गृह जिल्हा असलेल्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांचा बदल्या करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त अजय चारठणकर, मिनीनाथ दंडवते या दोन उपायुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. आता सहायक आयुक्तांची माहिती नगरविकास विभागाकडून मागवण्यात आली आहे. महापालिकेत राज्य सेवेतील सध्या 12 सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यापैकी नागरी सुविधाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, कर आकारणी व कर संकलन विभागाचे नीलेश देशमुख, अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांचा महापालिकेत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांचा पुणे जिल्हा आहे. तर ड क्षेत्रीय अधिकारी अंकुश जाधव आळंदी महापालिकेत मुख्याधिकारी होते. त्यानंतर ते वर्षभरापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू झाले होते. त्यामुळे त्यांचाही पुणे जिल्ह्यातील सेवेचा तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे या पाच अधिका-यांची बदली होण्याची शक्यता व्यक्त केली जात ( PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.