Loksabha Election : आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची

सुरक्षेचे कारण पुढे करून पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली

एमपीसी न्यूज – अमरावती लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब आणि भाजपच्या नवनीत राणा(Loksabha Election) आमने-सामने येत आहेत.दरम्यान सभेच्या मैदानावरून पोलिसांमध्ये आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर येत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, 23 आणि 24 एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात बच्चू कडू यांना प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ   उद्या(दि.24) रोजी सभा होणार असल्यामुळे बच्चू कडू यांना सभा घेण्यासाठी दिलेली परवानगी सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आणि त्यानंतर याच मैदानावर अमित शहा यांना उद्या(दि.24)  सभा घेण्यास परवानगी देण्यात असल्याचे कळते.यानंतर बच्चू कडू यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

LokSabha Elections 2024 :  ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत

आज(दि.23 एप्रिल) रोजी बच्चू कडू प्रहार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ  सायन्स कोर मैदानावर सभेच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांसह(Loksabha Election)  आले असता पोलिसांनी त्यांना आत येण्यास मनाई केली.आमच्याकडे सभा घेण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी असताना आम्हाला का थांबवत आहात  असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना उपस्थित केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उद्या होणाऱ्या सभेला परवानगी मिळाली असेल तर त्यांनी ती  दाखवावी अन्यथा ज्यांनी या सभेसाठी परवानगी घेतली आहे त्यांना सभा घेऊ द्यावी असेही बच्चू कडू यांनी पोलिसांना विचारले. मात्र पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे  करत बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मैदानात येऊ दिले नाही. दरम्यान, बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये यांच्यात जोरात शाब्दिक बाचाबाची झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.