Lonavala : फिरायला आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल

Case filed registered against 69 tourists visiting Lonavla मास्क न लावणार्‍या 44 जणांना दंड

एमपीसी न्यूज : पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात फिरायला आलेल्या तब्बल 69 पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार व रविवारी विशेष कारवाई मोहिम राबवत भादंवी कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले. तर मास्क न लावता फिरणार्‍या 44 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.

कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता शासनस्तरावरून वारंवार सुचना दिल्या जात असताना काही नागरिक या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या सोबत मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे.

लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद असताना काही पर्यटक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात येत आहेत. मागील तिन आठवडे सातत्याने विशेष मोहिम राबवत नाकाबंदी करत पोलीस प्रशासन कारवाई मोहिम राबवत आहे. शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनीत काँवत व लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलीस हवालदार अमोल कसबेकर, जयराज पाटणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी विशेष कारवाई मोहिम राबवत पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या पर्यटक वाहनांवर कारवाई करत त्यांना माघारी पाठवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.