Pune : सोमवारी मध्यरात्री पासून पुण्यात कडक लॉकडाऊन – आयुक्त विक्रम कुमार

Strict lockdown in Pune from midnight on Monday - Commissioner Vikram Kumar

एमपीसी न्यूज – सोमवारी (दि. 14 जुलै) मध्यरात्री पासून दिनांक 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे, त्यासंबंधीचे आदेश नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी रविवारी रात्री जाहीर केले.

मेडिकल, दवाखाने, बँका, पेट्रोल पपं (केवळ अत्यावश्यक वाहनांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 सुरू राहतील), गॅस सेवा घरपोच, दैनिक वर्तमानपत्र, पाणीपुरवठा करणारे टँकर सुरू राहणार आहेत. नुकतीच परवानगी दिलेले सर्व केश करत्नालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर संपूर्णतः बंद राहणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कोणतीही व्यक्ती वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी, दुचाकी जप्त करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्याचा वाहन परवानाही जप्त करण्यात येणार आहे. त्याच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक 14 जुलै ते दिनांक 18 जुलै पर्यंत संपूर्णतः बंद राहतील. त्यानंतर दिनांक 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने आणि त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.

Zomato, swigy व तत्सम ऑनलाइन पोर्टलवरून मागविले जाणारे खाद्यपदार्थ, सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, उद्याने, मॉर्निंग वॉक, एव्हीनिंग वॉक, उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (वंदे भारत योजने अंतर्गत कोविड – 19 करिता वापरात असलेले बागळुन) रिसॉर्ट, मॉल, सर्व किरकोळ आणि ठोक विक्रीचे भाजी मार्केट, फळे विक्रेते, मटण – चिकन, अंडी, मासे आदी दुकाने दिनांक 14 जुलै ते 19 जुलै संपूर्णतः बंद राहतील.

शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग बंद राहतील. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने – 2 चाकी, 3 चाकी आणि 4 चाकी संपूर्णतः बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने, विमानतळ, रेल्वे स्टेशन येथे जाणे – येणे करिता, वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर करता येईल.

पुणे मनपा क्षेत्रातील 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा, यकृत व मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधित रुग्ण असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.