Maharashtra Corona Update: सक्रिय रुग्ण संख्येने ओलांडला लाखाचा टप्पा

Maharashtra Corona Update: The number of active patients has crossed one lakh mark राज्यात कोरोनामुक्तांचे प्रमाण 55.15 टक्क्यांवर तर मृत्यूदर 4.4 टक्के

एमपीसी न्यूज – राज्यात आज (रविवारी) 3,340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 40 हजार 325 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 7827 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 17 हजार 895 नमुन्यांपैकी 2 लाख 54 हजार 427 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 47 हजार 801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 173 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.4 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 173 मृत्यू हे मुंबई मनपा-44, ठाणे-6, ठाणे मनपा-22, नवी मुंबई मनपा-10, कल्याण-डोंबिवली मनपा-5, उल्हासनगर मनपा-1, भिवंडी-निजापूर मनपा-2, मीरा-भाईंदर मनपा-2, पालघर-1, वसई-विरार मनपा-7, रायगड-1, पनवेल मनपा-1, नाशिक-1, नाशिक मनपा-7, धुळे-2, जळगाव-2, पुणे-5, पुणे मनपा-22, पिंपरी-चिंचवड मनपा-10, सोलापूर मनपा-3, कोल्हापूर-1, रत्नागिरी-1, औरंगाबाद-1, औरंगाबाद मनपा-5, जालना-3, लातूर-1, बीड-1, नांदेड-3, अकोला मनपा-1, गोंदिया-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण-92,988, बरे झालेले रुग्ण- 64,872, मृत्यू- 5,288, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 288, ॲक्टिव्ह रुग्ण- 22,504

ठाणे: बाधित रुग्ण-61,869, बरे झालेले रुग्ण- 26,489, मृत्यू- 1,646, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 33,733

पालघर: बाधित रुग्ण-9,744, बरे झालेले रुग्ण- 4,817, मृत्यू- 188, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,739

रायगड: बाधित रुग्ण- 8,459, बरे झालेले रुग्ण- 3,731, मृत्यू- 159, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 4,567

रत्नागिरी: बाधित रुग्ण- 870, बरे झालेले रुग्ण- 601, मृत्यू- 30, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 239

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 257, बरे झालेले रुग्ण- 205, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 47

पुणे: बाधित रुग्ण- 39,125, बरे झालेले रुग्ण- 16,427, मृत्यू- 1097, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 21,601

सातारा: बाधित रुग्ण- 1,709, बरे झालेले रुग्ण- 981, मृत्यू- 68, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 659

सांगली: बाधित रुग्ण- 597, बरे झालेले रुग्ण- 330, मृत्यू- 15, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 252

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 1,123, बरे झालेले रुग्ण- 807, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 296

सोलापूर: बाधित रुग्ण- 3,978, बरे झालेले रुग्ण- 2,076, मृत्यू- 344, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,557

नाशिक: बाधित रुग्ण- 7,080, बरे झालेले रुग्ण- 3,847, मृत्यू- 290, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,943

अहमदनगर: बाधित रुग्ण- 848, बरे झालेले रुग्ण- 524, मृत्यू- 20, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 304

जळगाव: बाधित रुग्ण- 5,810, बरे झालेले रुग्ण- 3,336, मृत्यू- 345, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,129

नंदूरबार: बाधित रुग्ण- 279, बरे झालेले रुग्ण- 149, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण-119

धुळे: बाधित रुग्ण-1,517, बरे झालेले रुग्ण- 835, मृत्यू- 76, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 604

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 8,217, बरे झालेले रुग्ण- 4,042, मृत्यू- 338, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3,837

जालना: बाधित रुग्ण- 983, बरे झालेले रुग्ण- 506, मृत्यू- 47, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 430

बीड: बाधित रुग्ण- 220, बरे झालेले रुग्ण- 105, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 ,ॲक्टिव्ह रुग्ण- 110

लातूर: बाधित रुग्ण- 664, बरे झालेले रुग्ण- 325, मृत्यू- 33, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 306

परभणी: बाधित रुग्ण- 200, बरे झालेले रुग्ण- 101, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 94

हिंगोली: बाधित रुग्ण- 341, बरे झालेले रुग्ण- 276, मृत्यू- 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 63

नांदेड: बाधित रुग्ण-572, बरे झालेले रुग्ण 251, मृत्यू- 24, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 297

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 381, बरे झालेले रुग्ण- 234, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण-133

अमरावती: बाधित रुग्ण- 823, बरे झालेले रुग्ण- 613, मृत्यू- 36, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 174

अकोला: बाधित रुग्ण- 1,875, बरे झालेले रुग्ण- 1,468, मृत्यू- 92, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 314

वाशिम: बाधित रुग्ण- 173, बरे झालेले रुग्ण- 104, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 65

बुलढाणा: बाधित रुग्ण- 399, बरे झालेले रुग्ण- 206, मृत्यू- 16, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 177

यवतमाळ: बाधित रुग्ण- 424, बरे झालेले रुग्ण- 280, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण-130

नागपूर: बाधित रुग्ण- 2022, बरे झालेले रुग्ण- 1,366, मृत्यू- 21, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 635

वर्धा: बाधित रुग्ण- 34, बरे झालेले रुग्ण- 14, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 18

भंडारा: बाधित रुग्ण- 162, बरे झालेले रुग्ण- 89, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 73

गोंदिया: बाधित रुग्ण- 210, बरे झालेले रुग्ण- 156, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0 , ॲक्टिव्ह रुग्ण- 51

चंद्रपूर: बाधित रुग्ण- 164, बरे झालेले रुग्ण- 96, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 68

गडचिरोली: बाधित रुग्ण- 115, बरे झालेले रुग्ण- 66, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 48

इतर राज्ये: बाधित रुग्ण- 195, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 31, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 164

एकूण: बाधित रुग्ण- 2,54,427, बरे झालेले रुग्ण- 1,40,325, मृत्यू- 10,289, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 297, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,03,516

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.