Pune Corona : पुण्यात कोरोनाचा कहर;आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

एमपीसी न्यूज : देशाची राजधानी दिल्लीनंतर आता राज्याची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातही कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 597 च्या वर गेली आहे. (Pune Corona) कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुणे शहर महानगरपालिकाही तयारीला लागली आहे. महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून शहरात एकूण 489 बेड सध्या सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढल्याने कोरोना टेस्ट, आरटीपीसीआर आणि इतर चाचण्या करण्याचे आदेशही आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनावरीलही ताण वाढला आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे.

राज्यभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याने (Pune Corona) पुणे महानगरपालिकेने आता कोरोना काळातील सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आले आहे.

पुणे शहारातील कोरोनाचे रुग्ण संख्या वाढली असली तरी राज्यातही काल एकूण 397 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.(Pune Corona) राज्यातील कोरोनाची संख्या वाढत असतानाच पुण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने आरोग्य विभाग आता सतर्क झाला आहे.

Gajanan Maharaj : शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

गेल्या तीन दिवसांत पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले असून 24, 25 आणिा 26 मार्च रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 597 च्या वर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुणे शहर महानगरपालिकाही तयारीला लागली आहे. महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून शहरात एकूण 489 बेड सध्या सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या चारही रुग्णालयात यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली असून महापालिके कडून पुन्हा लसीकरण अभियान होणार सुरू करण्यात आले आहे.तर शहरातील लसीकरणातही प्रचंड मोठी घट झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे. (Pune Corona) कोरोना रुग्ण संख्या अधिक वाढू नये यासाठी आता पुणे जिल्ह्यात आरोग्य प्रशासन मॉक ड्रिल घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्यात याव्यात असंही यावेळी सांगण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.