Lonavala : लोणावळा नगरपरिषदेने 74% पाणी कर केला वसूल

एमपीसी न्यूज : आजपर्यंत 74 टक्के पाणीपट्टी वसुल केल्याची माहिती (Lonavala) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यशवंत मुंडे यांनी दिली. येत्या चार दिवसांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट नगरपरिषदेने ठेवले आहे.

लोणावळा शहरात 13 हजार नळजोडण्या आहेत. यापैकी 9,000 जोडण्या निवासी आणि 4,000 व्यावसायिक पाणी जोडण्या आहेत. नगरपरिषदेचे 8.6 कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 6.3 कोटी रुपये आजपर्यंत वसूल करण्यात आले आहेत.

Pune Corona : पुण्यात कोरोनाचा कहर; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

थकबाकी वसुलीसाठी नगरपरिषदेने धडक मोहीम हाती घेतली असून अनेक व्यावसायिक मालमत्ता व हॉटेलचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले आहे. नागरिकांनीही कर भरण्याचे कर्तव्य समजून घ्यावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.