Lonavala : शहरातील व्यापार्‍यांचा चिनी वस्तू न विकण्याचा निर्णय

City traders decide not to sell Chinese goods

एमपीसीन्यूज : लडाख येथील गलवानच्या खोर्‍यात भारतीय सैन्यावर हल्ला करणार्‍या विश्वासघातकी चिनचा माल यापुढे न विकण्याचा निर्णय लोणावळा व्यापारी संघटनेने घेतला आहे. भविष्यात चिनी वस्तूंची खरेदी न करता स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भुमिका लोणावळा व्यापारी संघटनेने जाहीर केली आहे.

कोरोना विषाणूंची निर्मिती व प्रसार करत भारत देशासह संपुर्ण जगाला वेठीस धरलेल्या चिनने आता लडाखमधील गलवान खोर्‍यात भारतीय भुभाग हाडपण्याचा प्रयत्न चालविला आहे.

15 जुनच्या मध्यरात्री चीनी सैन्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहिद झाले.

या शहीद जवानांना लोणावळा व्यापारी संघटनेने श्रद्धांजली वाहिली. तसेच यापुढे चीनी वस्तूंची विक्री न करण्याचा निर्णय घेतला.

त्याचबरोबर नागरिकांनी देखिल चिनी मालावर बहिष्कार घालत स्वदेश मालाला चालना द्यावी, अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.