Lonavala: रेल्वेस्थानकावर कामगार वर्गाशी साधला युतीच्या कार्यकर्त्यांनी संवाद

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा कार्य अहवाल कामगारवर्गापर्यत पोहचविण्याकरिता युतीच्या कार्यकर्त्यांनी भल्या सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकावर जाऊन कामगार वर्गाशी संवाद साधला.
यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक बाळासाहेब जाधव, मंदा सोनवणे, हर्षल होगले व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • मावळ लोकसभा निवडणूक ही अटितटीची झाल्याने महायुती व महाआघाडीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. बारणे यांना मत म्हणजे मोदींना मत असे सांगत भाजपा पदाधिकार्‍यांनी बारणे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पुणे-लोणावळा लोकल मार्गाचा बारणे यांनी केलेला पाठपुरावा, लोणावळा रेल्वे स्थानकासह मतदारसंघातील रेल्वे स्थानकांचे बदलत असलेले रुप हे बारणे यांच्या पाठपुराव्यामुळेच झाले आहे, असे सांगत ज‍ाधव व पुजारी यांनी सकाळच्या सत्रात कामानिमित्त बाहेरगावी जाणार्‍या कामगारवर्गाशी संवाद साधला.
याविषयी बोलताना पुजारी म्हणाले, “लोणावळा शहरात प्रत्येक वार्डात प्रचार यंत्रणा राबवत महायुतीचे उमेदवार बारणे यांचे प्रचारपत्रक घरोघरी पोहचविण्यात आले आहे. शहरात भाजपा, शिवसेना, आरपीआयचे जवळपास 19 नगरसेवक असल्याने लोणावळ्यातून बारणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.