Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग गुरुवारी दुपारी दोन तास बंद राहणार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग उद्या गुरुवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तास बंद राहणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल हद्दीत गँट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली बायपास रोड मार्गे वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.