Lonavala : मराठा आरक्षण पदयात्रा बुधवारी लोणावळा मुक्कामी

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या ( Lonavala) नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा बुधवारी (दि. 24) पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळा येथे मुक्कामासाठी जाणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पदुकास्थान जवळ असलेल्या 200 एकर जागेत मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून सुमारे 50 जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागेची स्वच्छता करण्यात आली आहे. पदयात्रेत सहभागी झालेल्या बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील टँकर चालक दोन दिवस पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणार आहेत. लोणावळा शहर मंडप असोसिएशनच्या वतीने लाईट व मंडप, स्पीकर व्यवस्था करण्यात आली आहे.

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यात सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांच्या जेवणाच्या सोयीसाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातून चपात्या आणि चटणी जमा केली जात आहे. आज (बुधवारी) सकाळपासून प्रत्येक घरातून 25 चपात्या आणि शेंगदाणा चटणी गोळा केली जात आहे. हे जमा केलेले अन्नपदार्थ आंदोलनाच्या ठिकाणी मुंबई येथे पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या, ज्यांना आर्थिक मदत करता येईल त्यांनी आर्थिक मदत करा, ज्यांना वस्तू देता येतील त्यांनी वस्तू द्या, ज्यांना ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील हजारो मराठा बांधव कर्तव्य भावनेतून पदयात्रेत सहभागी झालेल्या बांधवांची शक्य त्या मार्गाने मदत करत ( Lonavala) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.