Lonavala News: लोणावळ्याचे माजी नगरसेवक बाळासाहेब कडू यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बाळासाहेब बबन कडू (वय 55) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल (शनिवारी) निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी नगरसेविका अंजना कडू, भाऊ, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जुना खंडाळा विभागाचे त्यांनी नेतृत्व केले असून सध्या त्यांची पत्नी नगरसेविका आहेत.

आज सकाळी घरात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्रथम लोणावळ्यातील संजीवनी रुग्णालयात व तेथून औंध येथील खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.