Lonavala News : मुंबईचा तरुण तुंगार्ली तलावात बुडाला; शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरु

एमपीसी न्यूज – कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत वसई येथून पर्यटनासाठी आलेला एक तरुण लोणावळा येथील तुंगार्ली तलावात बुडाला. ही घटना सोमवारी (दि. 16) घडली असून शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे.

अमित गुप्ता (वय 24, रा. वसई) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. अमित गुप्ता सोमवारी त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत लोणावळा जवळील तुंगार्ली तलावात फिरण्यासाठी आला होता. तलावात पोहण्यासाठी गेल्यानंतर तो अचानक बुडाला.

अमितच्या मित्रांनी सुरुवातीला त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. याबाबत शिवदुर्ग टीमला माहिती मिळाल्यानंतर टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतरही अमितचा शोध लागला नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. 17) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

शिवदुर्ग टीमचे केदार देवळे, सागर कुंभार, प्रविण देशमुख, अजय शेलार, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, दुर्वेश साठे, सतिष मेलगाडे, अशोक उंबरे, अभिषेक गायकवाड, राजेंद्र कडू,  पुनिकेत गायकवाड, सारंग गायकवाड, विकास मावकर, राजु पाटील, सुनिल गायकवाड, भगवान घनवट, अनिल सुतार, आनंद गावडे, अनिल आंद्रे, चंद्रकात बोंबले आदी सदस्य अमितचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.