Lonavala News : लोणावळ्यात फिरायला आलेले दोन तरुण खाणीत बुडाले

एमपीसी न्यूज – लोणावळ्यात फिरायला आलेल्या तरुणांपैकी दोन जणांचा आज खाणीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. निगडी रुपीनगर भागातील हे तरुण आहेत.

आकाश गुरव व वीरेंद्र त्रिपाठी अशी या खाणीत बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव यांचा आज वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी करण्यासाठी तो आणि त्याचे इतर चार मित्र त्यांच्या तीन मोटरसायकलवरून  लोणावळ्यात आले होते. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ते सर्व लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज समोर असलेल्या एका दगडाच्या खाणी कडे गेले होते. त्याठिकाणी गेल्यावर आकाश सोबत आलेले त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी आकाश आणि विरेंद्रही पोहण्यासाठी उतरला होता. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात दमछाक झाल्याने बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजात घटनास्थळी दाखल झालेले लोणावळा ग्रामीणचे पथक व शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने दोन्ही मृत युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.