Lonavala : निसर्ग वादळाचा एकविरा गडाला फटका; दुकानांचे मोठे नुकसान

Nisarga's storm hits Ekvira fort; Major damage to shops

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाचा एकविरा देवीच्या वेहेरगाव गडाला मोठा फटका बसला आहे. गडाच्या पायर्‍यांवरील सर्व दुकाने या वादळात मोडून पडली आहेत. तसेच अनेक झाडे तुटून गडाच्या पायर्‍यांवर पडली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुलस्वामीनी एकविरा देवीचा गड व गडावरील सर्व दुकाने आणि मंदिर हे सर्व गत दोन महिन्यांपासून बंद आहे. बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने या गडावरील सर्व दुकानांचे छत उडून गेले आहेत. वादळी पावसाने गडावर व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे हातावर पोट असलेले हारफुल विक्रेते व प्रसाद विक्रेते यांचे मोठे नुकसान झाले आहे. हारफुलांची दुकाने हेच वेहेरगाव भागातील युवकांचे उत्पन्नाचे साधन आहे. वादळाने ही दुकाने मोडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी या दुकानदारांची मागणी आहे.

बुधवारी आलेल्या निसर्ग चक्री वादळाने मावळ तालुक्यात विशेषतः लोणावळा परिसरात मोठे नुकसान केले. या भागात मोठ्याप्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत. अनके शेत शिवारांसह घरांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.