Pimpri: शहरातील 44 जणांना कोरोनाची लागण; 35 जण कोरोनामुक्त तर दोघांचा मृत्यू

Pimpri: Corona infection in 45 people in the city; 2 Deaths reported

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, पिंपरी,  आनंदनगर,  दापोडी,  चर्‍होली, भोसरी,  पिंपळेगुरव, चिंचवड, काळेवाडी, अजंठानगर या भागात 43 तर शहराबाहेरील खेड येथील 1 अशा 44 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, दापोडी येथील 80 वर्षीय वृद्ध तर राजगुरूनगर येथील 58 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत  आहे. शुक्रवारी वाकड, पिंपरी,  आनंदनगर,  दापोडी,  चर्‍होली, भोसरी,  पिंपळे गुरव, चिंचवड, काळेवाडी, अजंठानगर या भागातील 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 23 पुरुष आणि 21 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर,  शहराबाहेरील खेड  येथील 1 अशा 44 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दापोडी येथील 80 वर्षीय वृध्द तर राजगुरूनगर येथील 58 वर्षीय पुरूषाचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. किवळे, पिंपरी, निगडी, आनंदनगर, काळेवाडी फाटा, बौध्दनगर, पिंपळे सौदागर तर देहूरोड, सोलापुर, जुन्नर, खडकी, आंबेगाव येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या 35 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरात शुक्रवारअखेर 678 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 401 कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील 12 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 16 अशा 28 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 226 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 179

# पॉझिटीव्ह रुग्ण – 45

#निगेटीव्ह रुग्ण – 153

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 248

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 545

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 193

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 678

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 226

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  28

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 401

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23344

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 68836

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.