Lonavala : नितीन तिकोने यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाकडून देण्यात येणारा जिल्ह्याचा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार लोणावळा येथील अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे कला शिक्षक नितीन एकनाथ तिकोने यांना देण्यात आला.

शैक्षणिक, कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोलाच्या योगदाना बद्दल पुणे जिल्हा शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते संतोष पवार, कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष किरण सरोदे, सचिव मिलिंद शेलार त्याचबरोबर जिल्ह्यातील असंख्य कला कलाशिक्षक उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2