Lonavala : तिकोना गडावरील झाडे जागविण्याचा शिवप्रेमींचा अनोखा प्रयत्न

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा उपक्रम

एमपीसी न्यूज- श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना गडावर लावलेली झाडे जगविण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे उन्हाळ्यामध्ये देखील ही झाडे तग धरणार आहेत.

मागील महिन्यात काही समाजकंटकांनी लावलेल्या वणव्यात तिकोना गडावरील काही झाडे जळाली. या वणव्यातून वाचलेली झाडे जगवण्यासाठी शिवप्रेमी मंडळींनी वेगळा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतळी व पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर करून झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची नवीन कल्पना व्हाट्स अप वर पहायला मिळाली.

त्या प्रमाणे प्रयोग करून पाहिला असाता त्यात काही त्रुटी अढळल्या त्या व्यवस्थित करून मंगळवारी सर्व झाडांच्या मुळाशी पाण्याची एक एक बाटली ठेवुन झाडांना पाण्याची सोय करण्यात आली. झाडाच्या मुळाशी प्लॅस्टिकची पाण्याची भरलेली बाटली ठेवून तिच्या झाकणाला बारीक छेद घेऊन त्यातून एक सुतळी पाण्यात सोडून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी ठेवले. त्यामुळे बाटलीमधील पाणी सुतळीच्या साहाय्याने ठिबकसिंचनाद्वारे झाडाच्या मुळाशी पोहोचणार आहे. गडावरील झाडे उन्हाळ्यातही तग धरणार आहेत.

झाडाच्या पायथ्याशी ठेवलेली बाटली दोन दिवस चालेल म्हणजे रोज बाटली भरण्याचे काम करावे लागणार नाही. कमी कष्टात महत्वाचे काम होईल. परिणामी गडावर वृक्ष संपत्ती वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.