Lonavala : मराठा मावळा संघटनेतर्फे लोहगड किल्ल्यावर वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- मराठा मावळा संघटनेच्या वतीने आज लोहगड किल्ल्यावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांनी संपूर्ण गडावर स्वच्छता मोहीम राबवली.

यावेळी मराठा मावळा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब पुंडे उपस्थित होते. मावळ तालुका अध्यक्ष प्रसाद आण्णा कुटे, मावळ तालुका सोशल मिडीया अध्यक्ष नवनाथ केदारी, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, मावळ तालुका युवक सचिव सुधीर शेडगे, तालुका कार्याध्यक्ष किरण बिनगुडे, नाणे मावळ युवक अध्यक्ष संतोष कुटे, आदर मावळ युवक अध्यक्ष मयूर थोपडे, आदर मावळ युवक उपाध्यक्ष गणेश काटकर, गडकोट समिती उपाध्यक्ष संतोष साबळे, महिला तालुका अध्यक्ष संगीता निकम, मावळ तालुका महिला उपाध्यक्ष आरती बराटे, तालुका सरचिटणीस नीलम घाडगे तसेच मराठा मावळा संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.