Lonavala News : शिवसैनिकांसह युवा सैनिकांनी शिवसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा : राजेश पळसकर

एमपीसीन्यूज : मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार 12 जुलै ते 24 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शिवसैनिकांसह युवा सैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. गावागावात शिवसेनेसह युवा सेनेच्या शाखा सुरू करा, असे आवाहन युवा सेना विस्तारक व मावळ लोकसभा संपर्कप्रमुख राजेश पळसकर यांनी केले.

शिवसेना आणि युवासेना मावळ विधानसभा यांच्या वतीने शिवसंपर्क अभियानानिमित्त वाकसई ( ता. मावळ) येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पळसकर बोलत होते.

शिवसेना मावळ तालुका संपर्कप्रमुख गणेश जाधव, युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, युवा सेना तालुकाधिकारी शाम सुतार, शिवसेना महिला आघाडी संघटिका शैला खंडागळे यांच्यासह चंद्रकांत भोते, मदन शेडगे, सुरेश गायकवाड, बाळासाहेब फाटक, दत्ता भेगडे, भरत नायडू, राहुल नखाते, अनिता गोणते, वैशाली मराठे, कल्पना आखाडे, मनीषा भांगरे, युवा सेनेचे विजय तिकोणे, दिनेश पवळे, विनायक हुलावळे, प्रसाद हुलावळे, राकेश कालेकर, विशाल हुलावळे, प्रकाश थरकुडे, संदीप भुंबक, गणेश मोरे, तानाजी सुर्यवंशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ संपर्कप्रमुख गणेश जाधव म्हणाले, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती तसेच सरकारी योजना घरोघरी पोचविण्याचे काम करावे. कोरोनामुक्त गाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपयाययोजना आणि साहित्याचे प्रत्येक गावात वाटप करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.