Mahalunge Crime : महिलेला तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला व्हिडीओ कॉल करून (Mahalunge Crime) तिचे नग्नावस्थेत व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च 2022 या कालावधीत चाकण आणि खराबवाडी परिसरात घडला.

गौरव यादव (वय 21, रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

Chikhali : चिखली पोलीस ठाण्यात मोबाईल व गंठण चोरीचे गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी (Mahalunge Crime) महिलेसोबत मैत्री केली. त्यांनतर महिलेला व्हिडीओ कॉल करून तिला तिचे नग्नावस्थेत व्हिडीओ काढले. ते व्हिडीओ डिलीट करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला चाकण येथील एका लॉजवर बोलावले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.