Alandi : जावयाने केली सासूला मारहाण

एमपीसी न्यूज – देवाच्या आळंदीत (Alandi) बायकोला सासरी नेण्यासाठी आलेल्या जावयाने सासूला मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. हा प्रकार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडला असून याबाबत 7 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित सासूने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई आणि त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahalunge Crime : महिलेला तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जावई (Alandi) फिर्यादी यांच्या मुलीला सासरी नेण्यासाठी आळंदी येथील घरी आला. मुलीची तब्येत ठीक नसल्याने तिला दुसऱ्या दिवशी घेऊन जाण्याची विनंती फिर्यादींनी केली. त्यावरून चिडलेल्या जावयाने आणि त्याच्या आई वडिलांनी फिर्यादीस आणि त्यांच्या मुलीस शिवीगाळ केली. जावयाने फिर्यादीस मारहाण करून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.