Nighoje : भंगार व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भंगार व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी निघोजे (Nighoje) येथील शारदा मोटर्स या कंपनीत घडली.

अब्दुलरब अदिलसुल्ला शाह (वय 35, रा. चिखली) यांनी याप्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर मोहिते, राणा दौंडकर (रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : जावयाने केली सासूला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भंगार व्यावसायिक आहेत. ते निघोजे (Nighoje) येथील शारदा मोटर्स या कंपनीतील भंगार मटेरियल खरेदी करतात. कंपनीतून भंगार उचलण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. तसेच, फिर्यादी यांच्या ट्रकवरील चालक प्रकाश लेबर हयात समशुल इस्लम शहा व बरकतअली जवाहरअली शहा यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.