Marathwada Bhavan : पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा भवन उभारणीला लवकरच सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मराठवाडावासीयांचे (Marathwada Bhavan) मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. मराठवाडावासीयांना हक्काचे व्यासपीठ असावे, या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या काही दिवसात सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील मराठवाडावासीयांच्या दसरा स्नेह मेळाव्याचे शाहुनगर येथे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शक्तीचा गौरव म्हणून स्त्रियांच्या हस्ते उद्घाटन करून अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली. मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर संस्थेच्या वतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील मराठवाडावासीय मोठ्या संख्येने सहभागी (Marathwada Bhavan) झाले होते. विशेष म्हणजे या मेळाव्यात कुणाचाही सत्कार करण्यात आला नाही. भारतीय बैठक मारून गप्पांचे फड रंगले होते. एकप्रकारे विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. दरम्यान, पिरॅमिड हॉलमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे आयोजन नितीन चिलवंत व जीवन बोराडे यांनी केले होते.

Nighoje : भंगार व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

या स्नेहमेळाव्याला मराठवाड्याचे भुमिपुत्र या नात्याने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार, व्यंकटराव शिंदे,  गोरख भोरे, बाळासाहेब काकडे, सुर्यकांत कुरुलकर, मालोजी भालके, आण्णा मोरे, नरेंद्र माने, गोपाळ माळेकर, सत्यजित चवधरी, प्रशांत जाधव, डी. एस. राठोड, अभिमन्यु पवार, प्रल्हाद लिपने, तुकाराम गोंगाने, सुनील भोसले, जीवन बोराडे, चिलवंत, सतीश काळे, रामहारी केदार, मुंजाजी भोजने, मारुती बानेवार, शिवकूमार बायस, गणेश खरात, विजय घोडके, राजेंद्र गाडेकर, मनोज मोरे, प्रियंका बोराडे, रेश्मा चिलवंत, सुजाता पानपट, शिल्पा बोराडे, सारिका शिंदे, डॉ. प्रीती काळे, वैशाली बोराडे, गीतांजली बोराडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.