Pimpri: कौतुकास्पद ! बहीण-भावाचा दोनशे झाडांची लागवड करत जतन करण्याचा संकल्प

Admirable! Sibling vows to save by planting two hundred trees ; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून राबविला उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण केले. झाडे दहा फुटाची होइपर्यंत त्यांची जोपासना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह गेली दहा वर्षे वृक्षारोपण करीत आहेत.

याचेच अनुकरण करीत अभिषेक पवार व वैष्णवी पवार या भावा-बहिणीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत धारूर व मोर्डा या ठिकाणी दोनशे झाडांचे वृक्षारोपण केले.

शिवाय ही सर्व झाडे संरक्षक जाळीसह लावण्यात आली आहेत. ही झाडे दहा फुटांची होईपर्यंत त्यांना पाणी पुरवून त्यांचे जतन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच दरवर्षी 200 झाडे लावण्याचा संकल्पही करण्यात आला.

यावेळी जयहरी महाराज कुलकर्णी, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, काळूबापू ननावरे, प्रा. रत्नाकर खांडेकर, बालाजी पवार, विशाल पवार, दत्तात्रय पवार, रमेश कामठे, विजय पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.