Pimpri: ‘कोविड’साठी उपलब्ध बेड, व्हेंटिलेटरची माहिती पालिकेच्या संकेतस्थळ,’डॅशबोर्ड’वर प्रसिद्ध करा – अश्विनी चिंचवडे  

Beds available for 'Covid', Ventilator information published on Municipal Corporation's website, 'Dashboard' - Ashwini Chinchwade

एमपीसी  न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. बेड लवकर उपलब्ध होत नसल्याने रुग्ण, नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी कुठे, किती बेड आहेत, किती भरले आहेत, किती रिक्त आहेत. तसेच कोरोना संशयित,  पॉझिटिव्ह, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची आणि कोरोना काळजी (सीसीसी) केंद्रातील बेडची संख्या नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. त्याची  परिपूर्ण माहिती पालिकेच्या संकेतस्थळ, कोविडच्या ‘डॅशबोर्ड’वर दररोज प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत नगरसेविका चिंचवडे पाटील  यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना  दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोरोना  रुग्णसंख्या साडे आठ हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेडची उपलब्धतता देखील कमी आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत. त्याची माहिती रुग्णांना मिळत नाही.

पुणे जिल्ह्यातील रुग्णालयातील माहिती ऑनलाईन मिळते.  पण, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयातील बेडची परिपूर्ण माहिती नाही. त्यासाठी पालिकेने शहरातील रुग्णालयातील बेडची माहिती स्वतंत्र जाहीर करण्यासाठी तत्काळ पाउले उचलणे गरजेचे आहे.

त्याकरिता यंत्रणा कार्यान्वित करुन बेडची माहिती दररोज प्रसिद्ध केली पाहिजे.

उपलब्ध बेडची माहिती नसल्याने अनेक पॉझिटीव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यासाठी येतात.  परंतु, बेड उपलब्ध नसल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागते.  त्यांना मनस्पात सहन करावा लागतो.

रुग्णांवरील  उपचाराला विलंब होतो. त्यातून एखाद्याचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर थांबल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होण्याची भीती देखील आहे. त्यामुळे रुग्णांना महापालिका आणि खासगी रुग्णालयात बेड वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, बेडची माहिती व्हावी यासाठी तत्काळ ‘डॅशबोर्ड’ स्थापन करण्यात यावा.

कोरोना आणि कोरोना व्यतिरिक्तच्या आजारांसाठी कुठे, किती बेड आहेत, किती भरले आहेत, किती रिक्त आहेत. तसेच कोरोना संशयित पॉझिटिव्ह, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची आणि कोरोना काळजी केंद्रातील बेड यांची संख्या नागरिकांना उपलब्ध केली जावी.

नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती मिळाल्यास नागरिक त्या-त्या रुग्णालयातच जातील. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती दररोज संकेतस्थळ, डॅशबोर्डवर प्रसिद्ध करावी.

जेणेकरुन रुग्णांना बेडची माहिती मिळेल. त्यांना रुग्णालयात बेड अभावी ताटकळत थांबावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णालयात गर्दी देखील होणार नाही, असे नगरसेविका चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.