Weather Report : पुण्यात मध्यम तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्‍यता 

Weather Report: Chance of moderate rain in Pune and torrential rain in Mumbai

एमपीसी न्यूज – पुण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 

गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) ( 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : डहाणू 13 प्रत्येकी, अलिबाग, दापोली, मालवण, मुंबई (कुलाबा) 12 प्रत्येकी, रामेश्वरी, रोहा 11 प्रत्येकी, रत्नागिरी 10, हर्णे, खेड, वेंगुर्ला 9 प्रत्येकी, चिपळूण, देवगड, लांजा, मंडणगड, मुरुड, सावंतवाडी, श्रीवर्धन 8 प्रत्येकी,

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा, पाथर्डी 7 प्रत्येको, शेवगाव 6, अहमदनगर, महाबळेश्वर 5 प्रत्येकी, राहुरी, तळोदा 4 प्रत्येकी, लोणावळा (कृषी) 4 प्रत्येकी, चांदवड, दहिवडी माण, धाडगाव, अक्रानी (हायड्रो), धुळे, जावळी, मेधा, कर्जत, कोल्हापूर, ओझरखेडा , राधानगरी, शाहूवाडी सुरगाणा, यावल 2 प्रत्येकी, आजारा, इगतपुरी, पन्हाळा, पाटण, सातारा, श्री गोंदा, वडगाव मावळ, येवला 1 प्रत्येकी

मराठवाडा : अंबड, कैज 5 प्रत्येकी, अंबेजोगाई, मोमीनबाद, भोकरदन, पैठण, शिरूर कासार 4 प्रत्येकी, भूम, धारूर, कन्नड, तुळजापूर 3 प्रत्येकी, अहमदपूर, आष्टी, लोहारा, माहूर, नांदेड 2 प्रत्येकी, बीड, चाकूर, गंगापूर, जालना, कंधार, मानवत, सेलू , शिरूर अनंतपाल 1 प्रत्येकी.

विदर्भ : शेगाव, नागपूर एपी 10 प्रत्येकी., हिंगणा 6, बाळापूर, खारंगा ८, काटोल, साकोली 7, आर्णी, आष्टी, चंद्रपूर, पौनी, सडक अर्जुनी, सेलू 6, भंडारा, गोंड पिपरी, कळंब, कंपटे, नरखेडा, राजुरा, संग्रामपूर, तिवसा , अमरावती, आर्वी, भद्रावती, भामरागड, चांदूर, धामणगाव, घाटंजी, खामगाव, कुही 4 प्रत्येकी, अहीरी, अकोट, अंजनगाव, अर्जुनी मोरगाव, बाभुळगाव, बल्लारपूर, चांदूर बाजार, दर्यापूर, डिग्रस, एटापल्ली, हिंगणघाट, जिवती, पोभुणी, राळेगाव, रामटेक, सिरोंचा, तेल्हारा, तुमसर, वर्धा, वरुड 3 प्रत्येकी, अकोला, बटकुली, चामोर्शी, चिमूर, , देवळी, लखनूर, लाखनी, मोहाडी, , सावनेर, उमरेड, वरोरा 2 प्रत्येकी, आरमोरी, भिवापूर, चिखलदरा, कुरखेडा, महागाव, वाशिम, 1 प्रत्येकी..

घाटमाथा : धारावी 16, ताम्हिणी 10, कोयना (पोफळी) 2, भिरा 7, दावडी 5, शिरगाव 4, लोणावळा (टाटा), डुंगरवाडी 3 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस), वळवण 2 प्रत्येकी, कोयना (नवजा), खंद 1 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज :

16 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

17-18 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

19 जुलै: कोंकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

16 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तर तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

17 जुलै : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

18-19 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.